Oct 22, 2017

पश्चिम रेल्वेवर ‘जम्बो ब्लॉक’

पश्चिम रेल्वेवर ‘जम्बो ब्लॉक’

रेल्वे रुळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली व नायगाव स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली ते नायगाव अप व डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी ११ ते दुपारी ३ वा.

परिणाम : ब्लॉकदरम्यान अप व डाऊन जलद गाडय़ा बोरिवली ते नायगावदरम्यान धिम्या मार्गावरून चालवण्यात येतील.

मध्य रेल्वेवर ‘मेगाब्लॉक’

कुठे :  मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर

कधी : सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.४० वा.

परिणाम : ठाणे येथून रवाना होणाऱ्या जलद मार्गावरील सर्व गाडय़ा मुलुंड ते परळदरम्यान धिम्या मार्गावरून धावतील. तर सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ या दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांव्यतिरिक्त सर्व स्थानकांवरती थांबतील.

Source-Lok Satta

Translate in your language

M 1

Followers