Oct 22, 2017

मध्य रेल्वे उशिराने; प्रवाशांना मनस्ताप

मध्य रेल्वे उशिराने; प्रवाशांना मनस्ताप

वांगणी-शेलू स्थानकांदरम्यान सकाळच्या सुमारास रुळाला तडा गेल्यानं विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक दुरुस्तीच्या कामानंतरही अद्याप रुळावर आलीच नाही. मध्य रेल्वेवरील लोकल उशिरानं धावत आहेत. त्यामुळं भाऊबीजेसाठी घराबाहेर पडलेल्या उपनगरांतील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळं मध्य रेल्वेवरील कोलमडलेली लोकलसेवा आज भाऊबीजेच्या दिवशीही विस्कळीत झाली. सकाळीच वांगणी-शेलू या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळं कर्जत-पुण्याकडं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या जलद आणि धीम्या मार्गावरील लोकलसेवा अद्यापही सुमारे अर्धा तासाने उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेवरील स्थानकांवर प्रवाशांना लोकलची वाट पाहत बसावे लागत आहे. लोकल उशिरानं धावत असल्याची उद्घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असली तरी त्याचं कारण सांगितलं जात नाही. त्यामुळं प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्या कधी वेळेवर धावणार आहेत की नाहीत, असा संतप्त प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
Source-Maharashtra Times

 

Translate in your language

M 1

Followers